पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंढरपूरमध्ये एकादशीनिमित्त आलेल्या ५० भाविकांना विषबाधा

पंढरपूरमध्ये विषबाधा

कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या ५० भाविकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. हे सर्व भाविक रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील आहेत. या भाविकांवर पंढरपूर येथील नगरपरिषदेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

दशकांपासून सुरु असलेल्या प्रकरणाचा गोड शेवटः मोहन भागवत

संगमेश्वर येथील भाविक एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. पंढरपूरातील धुंडा महाराज मठाशेजारी असलेल्या इनामदार वाड्यात ते थांबले होते. एकादशीनिमित्त उपवास असल्यामुळे या भाविकांनी उपवासाचे पदार्थ खाल्ले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर रात्री अचानक यातील ५० भाविकांना उलट्या, मळमळीचा त्रास सुरु झाला.  

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालातील पाच महत्त्वाची निरीक्षणे

उलट्यांचा त्रास होऊ लागलेल्या भाविकांना ताबडतोब पंढरपूरातील नगरपरिषदेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांवर सध्या उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. या भाविकांमध्ये वयोवृध्दांचा देखील समावेश आहे. 

अयोध्या प्रकरण: हा कुणाचा विजय किंवा पराभव नव्हे - PM मोदी