पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक: विहिरीत आढळले आईसह ४ मुलींचे मृतदेह

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील ५ जणींचे मृतदेह गावातील विहिरीत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. मेहकर तालुक्यातल्या माळेगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. 

बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे पुन्हा सक्रीय - लष्करप्रमुख

सोमवारी पहाटे माळेगावजवळ असलेल्या तुळशीराम चोंडकर यांच्या शेतातील विहिरीत ५ जणींचे मृतदेह आढळून आले. ग्रामस्थांनी याबबात पोलिसांना माहिती दिली. उज्वला बबन ढोके (३५ वर्ष) या महिलेसह त्यांच्या चार मुली वैष्णवी बबन ढोके (९ वर्ष), दुर्गा बबन ढोके (७ वर्ष), आरूषी बबन ढोके (४ वर्ष) आणि पल्लवी बबन ढोके (१ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या सर्वांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेलची वाहतूक ठप्प

उज्वला ढोके यांनी रविवारी घरातल्यांना शेतात काम करण्यासाठी जाते असे सांगून ४ मुलींना घेऊन गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न आल्यामुळे त्यांच्या दिराने आणि सासऱ्याने गावभर शोध घेतला. मात्र त्या सापडल्या नाही. आज सकाळी त्या सर्वांचे मृतदेह गावाजवळील विहरीत आढळून आले. उज्वला यांच्या पतीचे महिनाभरापूर्वी निधन झाले होते. त्यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. 

शेअर बाजारात अच्छे दिन; सेन्सेक्स १,३१३ अंकांनी वधारला

या घटनेमुळे माळेगावात एकच खळबळ उडाली आहे. मेहकर पोलिस या घटनेचा शोध घेत आहेत. त्यांनी सामुहिक आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे. याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र पोलिस यासर्व बाजूने तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमके काय झाले याचा उलघडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.