पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

पंढरपूर अपघात

पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ५ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हे वारकरी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. वारकऱ्यांच्या टेम्पोने वीटा घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. अपघातातील मृत वारकरी बेळगावच्या मडोळी गावचे  आहेत. 

 

नितीन गडकरी मुंबईत, राजकीय हालचालींसाठी भाजपकडे खूप कमी वेळ

बेळगाव जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या टेम्पोने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये टेम्पोमधील ५ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सांगोला- पंढरपूर रस्त्यावर मांजरी गावाजवळ शुक्रवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास घडली. मृतांमध्ये टेम्पो चालकाचा ही समावेश आहे. तर इतर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी पंढरपूरला हलविण्यात आले आहे.

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस; मध्य रेल्वेची वाहतूक

बेळगाव जिल्ह्यातल्या मंडळी तालुक्यातील वारकरी कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. मृतांमध्ये चालक यल्लप्पा देवाप्पा पाटील(३७ वर्ष), कृष्णा वामन कणबरकर (४२ वर्ष), महादेव मल्लप्पा कणबरकर (४५ वर्ष),लक्ष्मण परशुराम आंबेवाडीकर (४५ वर्ष)अरुण दत्तात्रय मुतकेकर (३७ वर्ष) यांचा समावेश आहे.

राज्यातील शेतकरी सुखी व्हावा; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडं