पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अकोल्यात अंगावर वीज पडून चौघांचा मृत्यू

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

राज्यात मान्सूनोत्तर पावसाने कहर केला आहे. या पावसाने अकोल्यात बुधवारी ४ जणांचा बळी घेतला आहे. अंगावर वीज पडून चौघांचा मृत्यू झाला आहे. तेल्हार तालुक्यातील वरुड गावात ही घटना घडली आहे. कापूस वेचण्यासाठी शेतावर गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडली.

दिल्लीत आरएसएसची महत्वपूर्ण बैठक; भाजपचे नेते उपस्थित

बुधवारी दुपारी शेतात कापूस वेचण्यासाठी चौघे जण गेले होते. कापूस वेचत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये १२ वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू

राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. अकोला जिल्ह्याला सुध्दा या पावसाने झोडपून काढले आहे. या पावसाने शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; शेतीसह घरांचे मोठं नुकसान