पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीडमध्ये एसटी-टेम्पोमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

बीडमध्ये भीषण अपघात

बीडमध्ये एसटी बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. औरंगाबाद -मुखेड एसटी बसला  अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले आहेत. बीड जिल्ह्यातील चंदनसावरगाव जवळ ही घटना घडली आहे. जखमींना अंबेजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

'NPRसाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही, जनतेवर आमचा पूर्ण विश्वास'

केजकडे जाणारी एसटी बस आणि कोंबड्या घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपमध्ये चंदनसावरगाव येथे  जोरदार धडक झाली. दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात ऐवढा भीषण होता की यामध्ये एसटी बसचा एका बाजूने चुराडा झाला आहे.  या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याला मंत्रिमंडळाची

अपघाताची माहिती कळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवशांना एसटीमधून बाहेर काढून त्यांना अंबाजोगाई येथील रग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अंबेजोगाई- केज- मांजरसूबा रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरु आहे. या रस्त्यावर जागोजागी वळण असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. 

CAA: राहुल आणि प्रियांका गांधींना मेरठ शहराबाहेर पोलिसांनी