पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापूरात एसटी आणि जीपमध्ये भीषण अपघात; ४ जण ठार

सोलापूर अपघात

सोलापूरमध्ये एसटी बस आणि जीपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. बार्शी तालुक्यातील शेळगावजवळ ही घटना घडली आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवताना हा अपघात झाल्याची माहिती सांगितली जात आहे. 

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका; सरपंच निवडीचा अध्यादेश फेटाळला

बार्शी -सोलापूर मार्गावर शेळगावाजवळ एसटी बस आणि जीपची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. एसटी बस सोलापूरवरुन बार्शीकडे जात होती. तर जीप बार्शीवरुन सोलापूरच्या दिशेने जात होती. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये जीपचा चक्काचूर झाला. 

मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर; मोदींसह 'या' दिग्गजांची घेणार भेट

अपघाताची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना स्थानिकांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहेत. तर सर्व अपघातग्रस्त हे बार्शी पंचायत समितीचे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

बारावी गुणपत्रिकेवरील 'अनुत्तीर्ण' शेरा होणार गायब