पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशिक : रिक्षाला धडक देऊन एसटी बस विहिरीत, ९ ठार

एसटी बस विहरीत कोसळली

नाशिकमध्ये मंगळवारी दुपारी एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. एसटी बसने रिक्षाला धडक देत रिक्षासह एसटी विहरित कोसळली. या अपघातामध्ये ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

'९ फेब्रुवारीचा मोर्चा CAA आणि NRCच्या समर्थनार्थ नाही'

देवळा तालुक्यातील मेशी येथील देशदुत हॉटेलजवळ हा अपघात झाला आहे. सौंदाणे-देवळा रस्त्यावर एसटी बसचा टायर फुटला आणि बसने रिक्षाला धडक दिली. त्यानंतर एसटी बस रिक्षासह विहिरीचा कठडा तोडून  ६० फूट खोल विहिरीमध्ये कोसळली. विहिरीमध्ये रिक्षासह बस कोसळल्यामुळे रिक्षातील प्रवासी दबले गेले. हा अपघाताचा आवाज येताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

देशविरोधी भाषण करणाऱ्या शरजीलला बिहारमधून अटक

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ९ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या १८ जणांना बाहेर काढत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. एसटी बस कळवण आगराची आहे. ही बस मालेगाववरुन कळवण येथे चालली होती. चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर घटनास्थळी भेट दिली. तसंच, एसटीच्या विभाग नियंत्रकांसह अन्य अधिकार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

पाकिस्तानला १० दिवसांत हरवू शकतोः PM मोदी