पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

औरंगाबादमध्ये भाविकांच्या गाडीला अपघात; चौघांचा मृत्यू

औरंगाबाद अपघात

औरंगाबादमध्ये भाविकांच्या गाडीला भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव क्रुजरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेलरला मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातामध्ये ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबाद-जालना मार्गावर हा अपघात झाला आहे. जखमी भाविकांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

'आर्थिक विषयांवरील चर्चा केंद्रस्थानी राहावी'

औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव येथे मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात ऐवढा भीषण होता की क्रुजरचा समोच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातातील सर्व जण बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील आहेत. ते इगतपुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्याठिकाणावरुन परत येत असताना ही घटना घडली आहे. 

CAAविरोधात संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन

या अपघातामध्ये काशिनाथ देवरामव मेहेत्रे (६२ वर्ष), रवी बबन जाधव (३२ वर्ष), संगीता गणेश बुंदे (४५ वर्ष) आणि ऋषीधर देवराव तिडके (५५ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

विप्रोच्या सीईओंचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे पायउतार