पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीडमध्ये कारच्या भीषण अपघातात चौघे ठार

बीडमध्ये कारला भीषण अपघात

बीडमध्ये कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव इंडिका कार ट्रान्सफॉर्मरला धडकून झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. 

 

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेजच्या इमारतीला भीषण आग

आंबेजोगाईवरून अहमदनगरकडे जाणाऱ्या कारला भीषण अपघात झाला. गेवराई तालुक्यातील तांदळा गावाजवळ ही घटना घडली.  चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरवर धडकली. ट्रान्सफॉर्मर कारवर पडून झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

कोरोनाची लक्षणे असल्यास ही औषधे अजिबात घेऊ नयेत

अपघातानंतर बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला रुग्णालयात दाखल केले. हा अपघात एवढा भीषण होता की आवाजाने तांदळा गावातील नागरिक जागे झाले. अपघातामध्ये रिजवान आयुब पटेल,   विजयकुमार श्रीरंग नागरगोजे, गणेश मोहन शिरसाट यांचा मृत्यू झाला. तर आणखी एका मृताची ओळख पटली नाही. 

...तर आयपीएल स्पर्धा बाहेरही खेळवली जाऊ शकते