पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२२ वर, एका दिवसात १५ रुग्णांची भर

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११६ वर गेला आहे. (रुग्णालयाचे संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात करोनाचे १२२ रुग्ण झाले आहेत. दिवसभरात १५ नवीन प्रकरणे समोर आली. यात मुंबईतून ९, ठाण्यातून १ आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधून ५ प्रकरणे समोर आली.

घराबाहेर पडाल तर शत्रू आपल्या घरात प्रवेश करेल: मुख्यमंत्री

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली. मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा ४७ पर्यंत गेला आहे. मुंबईतील नवे ४ रुग्ण हे विदेशातून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याचे किंवा स्वतः विदेशात जाऊन आल्याचे सांगण्यात येते. 

तत्पूर्वी, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील ज्यांना पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. इस्लामपूरमध्ये यापूर्वी जे ४ रुग्ण आढळले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने या रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीचे रुग्ण हे सौदी अरेबियातून आले होते.

रोजंदारीवर पोट असलेल्यांना मदतीचा हात द्या!-सानिया

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, सर्वांना कोरोनाच्या संकटाबद्दल पूर्ण कल्पना आली आहे. युद्धात आपला शत्रू नकळत वार करत असतो. तसंच हा शत्रू न दिसणारा आहे. तो कुठून हल्ला करेल हे माहिती नाही. घराबाहेर पडाल तर शत्रू आपल्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे सावधगिरी बाळगा, असे आवाहन त्यांनी केले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देत करोनाच्या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारु, असे सांगितले.