पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीडमध्ये दोन दिवसात ४ शेतकऱ्यांची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड जिल्ह्यामध्ये दोन दिवसांमध्ये ४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामध्ये ६५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. दुसरी घटना बीड तालुक्यातील मैंदा येथे नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली. तिसरी घटना माजलगाव तालुक्यामध्ये २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तर चौथी घटना अंबाजोगाई येथे घडली असून या शेतकऱ्याने देखील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. 

'मुस्लिमांमधील ५० पत्नी, १०५० अपत्ये ही प्राण्यासारखीच प्रवृत्ती'

गेवराई तालुक्यातील सुशी येथील बाबासाहेब भांडवलकर या ६५ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. शेतातील राहत्या घरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून त्यांनी आपले जीवन संपवले. महत्वाचे म्हणजे दोन दिवसांपूर्वी ते आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेऊन आले होते. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

भाजपचाच मुख्यमंत्री होणार, सरोज पांडेंची पुन्हा युतीवर ठिणगी

दुसरी घटना बीड जिल्ह्यातील राजेवाडी गावात घडली आहे. या गावातील २६ वर्षीय तरुण शेतकरी गणेश घुबडे याने आत्महत्या केली आहे. सततची दुष्काळ परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कुटुंबाला जगवायच कसं या विवंचनेतून त्याने आपले जीवन संपवले आहे. मध्यरात्री घरामधील सर्वजण गाढ झोपेमध्ये असतानाच या शेतकऱ्याने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली आहे. गणेश घुबडे या शेतकऱ्याने कर्ज घेऊन पेरणी केली होती. मात्र दुष्काळामुळे त्याच्या पदरात काहीच पडले नव्हते. तसंच २०१६ मध्ये त्याचे लग्न झाले होते. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या पाश्चात आई, पत्नी, लहान मुलगी असा परिवार आहे. 

ICC World Cup: जाणून घ्या पुढचा विश्वचषक कधी, कुठे खेळवला 

तिसरी घटना केज येथे घडली आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ५४ वर्षीय बाबुराव गुंड या शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. या शेतकऱ्याने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पीक कर्ज घेतले होते. यावर्षीच्या खरीप हंगामात त्यांनी शेतात पेरणी केली पण अद्याप पाऊस पडला नाही. त्यामुळे हे वर्ष देखील कोरडे गेले तर कर्जाचे पैशे द्यायचे कसे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. बाबुराव गुंड या शेतकऱ्याने शेतामध्येच विष प्राशन करुन आपले जीवन संपवले. मुलींचे लग्न कसे करायचे, बँकेचे कर्ज कसे फेडावे ही चिंता बाबुराव यांना सतावत होती. याबाबत त्यांनी नातेवाईकांना सांगितले होते. त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

सचिन तेंडुलकरच्या 'वर्ल्ड कपXI'मध्ये धोनी नाही
 
चौथी घटना बीड तालुक्यातील मैंदा येथे घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या केशव दादाराव मोमीन या शेतकऱ्याने देखील आत्महत्या केली आहे. सततची नापिकीला कंटाळून या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे मैंदा येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षापासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांमध्ये ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे बीड जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.