पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३५२ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २,३३४ वर

कोरोना विषाणू चाचणी (संग्रहित छायाचित्र)

राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले तब्बल ३५२ नवे रुग्ण आज आढळले. या नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २ हजार ३३४ वर पोहचला आहे. चोविस तासात सर्वाधिक रुग्ण आढळल्याचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा  २४२ इतका आहे. सोमवारी कोरोनाने एकूण ११ जणांचा बळी घेतला. राज्यातील मृतांचा आकडा हा  १६० वर पोहचला आहे.

चीन, ब्रिटनपेक्षा न्यूयॉर्कमध्ये कोरोना रुग्ण जास्त,७००० जणांचा मृत्यू

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात आली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय वर्गवारी करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार  रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन अशी वर्गवारी देखील करण्यात आली आहे.

Good News: १५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण

राज्यातील ज्या भागात कोरोनाचा आकडा वाढत आहे त्या भागात आणखी कठोर निर्बंध आखण्यात येत आहेत. लॉकडाऊनचा निर्णय हा ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला असून गरज पडल्यास यात आणखी वाढ केली जाऊ शकते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कोरोनाविरोधातील लढा जिंकण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आहवान वांरवार करण्यात येत आहे.

कोविड १९: पुणे शहरातील आणखी २२ ठिकाणे सील करण्याचा प्रस्ता

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस चिंता वाढवताना दिसतो आहे. मुंबईसह पुण्यातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा अधिकप्रमाणात वाढत असून शहरातील आणखी काही परिसर सील करण्यात येण्याची शक्यता आहे. महापालिकेकडून यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला असून पुणेकरांवरील निर्बंध आणखी वाढणार आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:352 new COVID 19 cases in Maharashtra taking tally to 2 334 while death toll rises to 160