पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघर प्रकरण: कासा पोलिस ठाण्याच्या ३५ पोलिसांची बदली

पालघर प्रकरण

पालघरमध्ये दोन साधूंसह तीघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कासा पोलिस ठाण्याच्या ३५ पोलिसांची बदली करण्यात आली आहे. पालघर पोलिसांच्या पीआरओने एएनआयच्या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली आहे. सध्या पालघर प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आला आहे. 

अभिनेता इरफान खानचे निधन

पालघरमधील गडचिंचले गावामध्ये चोर आल्याच्या संशयावरुन दोन साधूंसह त्यांच्या गाडीचालकाची जवामाने निर्घृण हत्या केली. गेल्या काही दिवसांपासून पालघर परिसरात किडनी चोर फिरत असल्याची अफवा पसरल्या होत्या. दाभाली-खानवेल मार्गावरुन जाणाऱ्या इको कारला गावकऱ्यांनी अडवले. या कारमधून कांदिवली येथून सुरत येथे मित्राच्या अंत्यविधीसाठी दोन साधू आणि कारचालक जात होते. गावकऱ्यांनी तिघांची लाठ्या, काठ्या आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. 

देशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग

दरम्यान, याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत ११० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर यातील प्रमुख ५ आरोपीही सध्या कारागृहात कैद आहेत. दरम्यान, याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांनी दिली होती. त्याचबरोबर गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडून अहवालही मागवला आहे. त्याचप्रमाणे आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. 

चीनमुळे आज १८४ देशांना नरकयातना भोगाव्या लागताहेत - डोनाल्ड ट्रम्प

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:35 policemen of kasa police station have been transferred in connection with palghar incident