पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ७८१ वर

सध्याच्या परिस्थितीत डॉक्टरांसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सोमवार सकाळपर्यंत ७८१ वर पोहोचला आहे. आज दुपारपर्यंत राज्यात ३३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात १९ रुग्ण हे पिंपरी- चिंचवड,  ११ रुग्ण हे मुंबई, प्रत्येकी एक रुग्ण हा अहमदनगर, सातारा  आणि वसईचा आहे त्यामुळे ही संख्या आता ७८१ वर पोहोचली आहे.

पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; घरांना गेले तडे

रविवारी राज्यात ११३ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. यातील सर्वाधिक ८१ रुग्ण हे मुंबईत होते. तर आतापर्यंत राज्यात ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत कोरोना बाधितांची संख्या ही सर्वाधिक आहे. मुंबईत रविवारी दिवसाअखेर मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा हा ४५८ वर पोहोचला होता. मुंबईतील प्रभादेवी, वरळी, मलबार हिल, अंधेरी, भायखळा  आणि मालाडमध्ये सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहे. एकूण रुग्णांपैकी ५३ टक्के रुग्ण हे या भागात आहेत.

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत १२०० जणांचा मृत्यू

देशात कोरोना बाधितांचा आकडा हा ४ हजार ३१४ वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही १०९ आहे. कोरोनावर मात करुन २९२ लोक यातून बरे झाले आहेत.