पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३२८ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३,६४८ वर

कोरोना विषाणू चाचणी (संग्रहित छायाचित्र)

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने शनिवारी साडेतीन हजारीचा टप्पा पार केला. मुंबईतील १८४ आणि पुणे शहरातील ७८ रुग्णांसह राज्यात आज नवे ३२८ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात ३ हजार ६४८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्यातील कोरोनाग्रस्तांमध्ये मुंबई-पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. एकट्या मुंबईमध्ये आतापर्यंत २ हजार २६९ रुग्ण आढळले आहेत. 

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजारांची आर्थिक मदत

राज्यातील कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाबाधितांसाठी पूर्वीपेक्षा अधिक खाटा (बेड) उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती दिली आहे.  राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुणे, बारामती, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, धुळे, लातूर, नांदेड, मिरज, औरंगाबाद, जळगाव आणि अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात एकूण ३७२५ खाटा कोरोना बाधीतांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 

कोरोनावर मात करत देशात आतापर्यंत १,९२२ रुग्ण बरे झाले: आरोग्य मंत्रालय

यापूर्वीच्या ३० रुग्णालयातील २ हजार ३०५ खाटा आणि नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ४ हजार ३५५ खाटा अशा राज्यात एकूण ६ हजार ६६० खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.  कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली असून आरोग्य विभागाने नव्याने आठ रुग्णालये तर वैद्यकीय शिक्षण विभागाने १७ रुग्णालये अधिसूचित केली आहेत. त्यामुळे अतिरीक्त ४ हजार ३५५ खाटांची उपलब्धता झाली असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:328 persons test positive for coronavirus in Maharashtra taking total to 3 648 health department