पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साताऱ्यात शिवशाही बसला अपघात; ३० प्रवासी जखमी

सातारा बस अपघात

साताऱ्यामध्ये शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. पाचगणीजवळ पसरणी घाटामध्ये ही घटना घडली आहे. शिवशाही बस आणि खासगी ट्रव्हल्स बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 

अमित शहा म्हणाले, ...म्हणून नागरिकत्व सुधारणा विधेयक आवश्यक

महाबळेश्वरहून ट्रॅव्हल्स बसमधून लग्नाचे वऱ्हाड जात असताना पसरणी घाटामध्ये भीषण अपघात झाला. शिवशाही बस आणि ट्रॅव्हल्सची समोरा-समोर धडक झाली. अपघातानंतर ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाली. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्समधील ३० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना वाई येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मुंबई हायकोर्टाकडून अरुण गवळीची जन्मठेप कायम

शिवशाही बस वाईवरुन महाबळेश्वरकडे जात होती. त्याचवेळी महाबळेश्वरवरुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रव्हल्स बसने शिवशाहीला धडक दिली. या अपघातामध्ये बसमधील ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे. वाई पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु आहे. 

राजकीय स्थैर्यासाठी लोकांचा भाजपवरच विश्वास - नरेंद्र मोदी