पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संगमनेरमध्ये कापसाच्या टेम्पोला अपघात; ३ मजूरांचा मृत्यू

आंबेनळी घाटात एसटी बसला अपघात

अहमदनगरमध्ये कापसाचा टेम्पो पलटी होऊन तीन मजूरांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे ही घटना घडली आहे. हंगेवाडी- ओझर रस्त्याच्याकडेला असलेल्या ओढ्यामध्ये मालवाहू कापसाचा टेम्पो पलटी झाला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. टेम्पोखाली चिरडून तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला. 

कलम ३७०, नागरिकत्व दुरुस्तीनंतर आता भाजपचा या दोन कायद्यांवर फोकस

शेख परवेज शेख नासिर (वय २१, इस्लामपुरा, जामनेर, जि. जळगाव), शेख जुनेद शेख भिकन (वय १९, बिस्मील्ला नगर, जामनेर, जि.जळगाव), शेख फरहान शेख हारून (वय १८, तलहानगर, जामनेर, जि. जळगाव) असे मृत्यू झालेल्या मजुरांची नावं आहेत. गुरुवारी दुपारी नाशिक येथील एका व्यापाऱ्याकडे असणारा कापूस भरण्यासाठी जळगाववरुन हे मजूर आले होते. कापूस भरून हा टेम्पो हंगेवाडी -ओझर मार्गे बाभळेश्वर फाट्याकडे जात होता. त्याचवेळी हा अपघात झाला आहे. 

निर्भया प्रकरण: दोषींच्या फाशीवरील सुनावणी पुढे ढकलली

चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे टेम्पो रस्त्यालगत असलेल्या ओढ्यात पलटी झाला. टेम्पोखाली आल्यामुळे तिन्ही मजूरांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतील. तिघांना टेम्पोखालून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणाचा तपास संगमनेर पोलिसांकडून सुरु आहे.  

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा: अनिल गोटे