पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमरावतीत पावसाचा कहर; अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू

वीज पडून ८ मुलांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे तर तिघे जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे ही घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींवर अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

राष्ट्रवादी विधीमंडळाच्या नेतेपदी अजित पवारांची निवड

अमरावती-अचलपूर मार्गावरील आसेगाव पूर्णाजवळ दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली आहे. अचानक पाऊस आल्यामुळे हे सर्वजण एका झाडाखाली उभे होते. त्याचवेळी अचानक वीज पडून तिघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 

दिल्लीत आरएसएसची महत्वपूर्ण बैठक; भाजपचे नेते उपस्थित

अंगावर वीज पडून सोनाली गजानन बोबडे ( ३२ वर्ष. रा. बोपापूर तालुका अचलपूर), शोभा संजय गाठे (४५ वर्ष. रा. विलासपुरात अचलपूर), सय्यद नसरुद्दीन सय्यद बदरुद्दीन (६५ वर्ष. रा.अंजनगाव सुर्जी) याचा मृत्यू झाला. तर स्वप्नील ज्ञानेश्वर वाट (२९ वर्ष रा. बडनेरा) याच्यासह आणखी दोन जण जखमी झाले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पुणे जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; शेतीसह घरांचे मोठं नुकसान