पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूरमध्ये टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

नागपूर अपघात

नागपूरमध्ये भीषण अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील चांपा उटी नर्सरीजवळ हा अपघात झाला आहे. आज सकाळी टेम्पा आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून सुरु आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांचा शिवसेनेत प्रवेश

आज सकाळी बाईकवरून तिघे जण चांपावरून गिरडकडे जात होते. त्याच दरम्यान उमरेडवरून भरधाव आलेल्या टेम्पोने दुचाकीला समोरुन धडक दिली. या अपघातामध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान तिचा देखील मृत्यू झाला. 

आनंद शिंदेंचा राजकारणात प्रवेश; सोलापूरात केली घोषणा