पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशिक जिल्ह्यात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू

दक्षिण सोलापूरः वीज पडून एका महिलेसह तिघांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. या पावसाने तिघांचा बळी घेतला आहे. पावसामुळे वीज कोसळून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. इगतपुरी तालुक्यात दोघांचा तर दिंडोरी तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तसंच या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. 

आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार

शनिवारी नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांना परतीच्या पावसाने झोडपून काढले. इगतपुरी तालुक्यात दुपारी तीनच्या दरम्यान विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी शेतात गुरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या हीराबाई सदगीर (४७ वर्ष) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

नाशिक जिल्ह्यात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू

दुसरी घटना इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथे घडली आहे. भरत भाऊराव भले (४० वर्ष) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, तिसरी घटना दिंडोरी तालुक्यात घडली आहे. आंबेवणी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, अंगावर वीज पडून यमुनाबाई गांगोडे यांचा मृत्यू झाला आहे. 

आरेच्या मुद्यावरुन आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा