पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

बुलढाणा भिंत कोसळली

बुलढाण्यात घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये गर्भवती महिला आणि लहान मुलाचा समावेश आहे.  मेहकर शहरातील इमामवाडा परिसरात ही दुर्घघटना घडली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक भिंत कोसळली. 

काँग्रेसची १२५ पैकी १०४ नावे निश्चित, या नेत्यांना उमेदवारी पक्की

मेहेकर येथील इमामवाडा परिसरात राहणारे शेख कुटुंब मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक घराची भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली शेख कुटुंबातील ५ जण दबले गेले. भिंत कोसळल्याचा आवाज आल्यानंतर शेजारच्यांनी शेख यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. सर्वांना मेहकर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र ३ जणांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांवर उपचार सुरु आहेत. 

बलात्काराचा आरोप असलेले स्वामी चिन्मयानंद यांना अटक

या दुर्घटनेत शेख असिफ शेख अशरफ (२८ वर्ष) यांच्यासह त्यांची पत्नी शाहिस्ता बी शेख असिफ (२५ वर्ष) आणि त्यांचा सहा वर्षाचा मुलगा जुनेद शेख असिफ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर शेख तहेर शेख अशरफ (२० वर्ष) आणि सुजान शेख असिफ (८ वर्ष) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुलढाण्यामध्ये गुरुवारी सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता. तर रात्रीपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळेच घराची भिंत कोसळली असल्याचे सांगितले जात आहे.  

काँग्रेसने ५ वरिष्ठ नेत्यांची निवडणूक प्रभारी पदी केली नियुक्ती