पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूरग्रस्त भागात एनडीआरएफच्या २८ टीम कार्यरतः सुभाष देशमुख

कोल्हापुरात मदतकार्य करत असलेले एनडीआरएफ पथक

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) २८ टीम कार्यरत आहेत अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

भामरागडमध्ये नदीचे पाणी घरात घुसले, संततधार पाऊस सुरुच

एनडीआरएफ पथक संख्या

एनडीआरएफचे १८ पथक राज्यात कार्यरत असून ओडिशावरुन ५ एनडीआरएफ पथक आले आहेत. तसेच ५ पथक भटिंडावरुनवरून आले आहेत.
सांगली – ११, कोल्हापूर – ६, मुंबई-३,नाशिक – १, पुणे – १, पालघर – १, ठाणे – १, रायगड – १, सिंधुदुर्ग – १, सातारा – १, नागपूर – १ अशी २८ पथके कार्यरत असून या शिवाय एसडीआरएफचे धुळ्याचे पथक १ कोल्हापूरला आणि २ पथके सांगलीला पाठविण्यात आले आहेत. 

तटरक्षक दलाचे २ पथक ४ बोटी व एनडीआरएफच्या एका बोटीसह मुंबईवरून कोल्हापूरसाठी निघाल्या आहेत. तसेच एनडीआरएफची अतिरिक्त ५ पथकांची मागणी केली असून त्या अनुषंगाने तातडीची मदत म्हणून ३ पथक पाठविण्यात आले आहेत.

कोल्हापूर-सांगली महापूरः गरज भासल्यास एअर लिफ्टिंग करु- मुख्यमंत्री फडणवीस

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुरपरिस्थितीची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक अभय यावलकर सतत माहिती घेत असून जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी राज्यातून मागणी आहे त्या नुसार पथकांची नियुक्ती करण्यात येत असून पूरपरिस्थितीबाबतचा सतत आढावा घेण्यात येत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:28 NDRF Teams working in flood affected areas like kolhapur sangali and satara says subhash deshmukh