पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पावसाअभावी पीक करपले; शेतकऱ्यांनी पिकांवर फिरवला नांगर

पिकांवर नांगर फिरवला

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील म्हणाला तसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. आधीच या भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. बीड जिल्ह्यात देखील तिच परिस्थिती आहे. अशात जून महिन्यात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली होती. मात्र पुन्हा पाऊस न झाल्यामुळे शेतात उभी असलेली पीक करपत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या २५ गावातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला. 

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अंबादास दानवे विजयी

बीडमधील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची लागवड केली होती. हजारो रुपये खर्च करुन या पिकांची लागवड केली होती. ऑगस्ट महिना संपत आला तरी पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ झाली नाही. पाणी नसल्यामुळे पीक करपायला लागले. त्यामुळे हातचे खरीप पिक गेले आता रब्बीची पेरणी तरी करु या अपेक्षेने बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील २५ गावांमधील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला. जवळपास २ हजार हेक्टरपेक्षा जास्त खरीप पिकांवर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला आहे. 

पीटर, इंद्राणी मुखर्जीला कधीच भेटलो नाही : कार्ती चिदंबरम

आधीच दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशामध्ये यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतामध्ये पेरणी केली. यंदा तरी हाती चांगले उत्पन्न येईल असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र त्यांची निराशा झाली आहे. डोक्यावर वाढणारे कर्ज, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा यामुळे आधीच शेतकरी चिंतेत आला आहे. आता हातचे पीक सुध्दा गेले त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उभा राहिला आहे. 

दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली: रणदीप सुरजेवाला