राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून ती २६ झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत ही माहिती दिली. देशातील सर्वाधिक रुग्ण आता महाराष्ट्रातील आहेत. शनिवारी यवतमाळ २ आणि नागपूरमध्ये १ रुग्ण आढळून आला. कामोठे (रायगड) येथेही एक रुग्ण आढळून आला. तर शुक्रवारी सायंकाळी अहमदनगरमध्येही १ रुग्ण आढळून आला होता. हे सर्व रुग्ण परदेशात जाऊन आले होते, अशी माहिती समोर येत आहे.
Maharashtra Health Minister Rajesh Tope: Total positive #Coronavirus cases in the state rise to 26. (file pic) pic.twitter.com/E74mAJIr1O
— ANI (@ANI) March 14, 2020
नागपूर येथे एका ४३ वर्षीय आयटी व्यावसायिकाला कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. हा रुग्ण अमेरिकेचा दौरा करुन आलेला आहे. तर यवतमाळ येथे आढळून आलेले दोन्ही रुग्ण हे दुबईला जाऊन आले होते. या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे यवतमाळचे जिल्हाधिकार एम डी सिंग यांनी सांगितल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
कोरोना राष्ट्रीय आपत्ती; मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत
MD Singh, Collector Yavatmal: Two persons have been tested positive for #Coronavirus in Yavatmal; both have travel history to Dubai. #Maharashtra
— ANI (@ANI) March 14, 2020
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २६ इतकी झाली आहे. पुणे-पिंपरी चिंचवड-१०, मुंबई-५, नागपूर-४, यवतमाळ-२, ठाणे-१, कामोठे (रायगड)-१, नवी मुंबई-१, कल्याण-१ आणि अहमदनगर-१ या जिल्ह्यात मिळून २६ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील सर्व १० रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
आईस्क्रीम खाण्यास नकार दिल्याने युवकाची हत्या
अहमदनगरमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ४ जण दुबईला फिरण्यासाठी गेले होते. त्याठिकाणावरुन परत आल्यानंतर यामधील सर्वांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. तर यामधील एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहमदनगरच्या या चारही जणांनी त्याच विमानातून प्रवास केला होता ज्या विमानातून पुण्यातील पाच कोरोना विषाणूबाधित रूग्णांनी प्रवास केला होता.