पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार पार, ८२ नव्या रुग्णात भर

कोरोना विषाणूबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोमवारी आणखी ८२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २०६४ वर पोहचला आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक ५९ आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागने दिली आहे. रविवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९८२ होती. तर आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दहावीचा भूगोलचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीचीही परीक्षा होणार नाही

राज्यात १२ तासांमध्ये ८२ नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईत ५९, मालेगावमध्ये १२, ठाण्यात ५, पुण्यात ३, पालघरमध्ये दोन आणि वसई-विरारमध्ये एक रुग्ण सापडला आहे. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती होम क्वारंटाइन असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत १४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यापैकी अनेक रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. दरम्यान, मुंबईत कोरोनाचा विळखा सर्वात जास्त आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहे. हा परिसर सील करण्यात आला आहे.  

भारताच्या कारवाईत १५ पाकिस्तानी सैनिक आणि ८ दहशतवादी ठार