पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यवतमाळमध्ये भीषण कार अपघातात दोघांचा मृत्यू

आंबेनळी घाटात एसटी बसला अपघात

यवतमाळमध्ये कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

'शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल'

नागपूर- हैदराबाद महामार्गावर पिंपळखुटी गावाजवळ हा अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणारी जॅग्वार कार खड्ड्यामध्ये आदळली त्यामुळे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. अपघाता दरम्यान कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये २० फूट खोल कोसळली. 

उपमुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब थोरातांचे नाव आघाडीवर?

या अपघातामध्ये योगेश गुप्ता आणि पटाली किशोर कुमार कष्णाचार्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अदीलाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोन जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 

'शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल'