पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साताऱ्याच्या कोयना परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के

भूकंप मापनाचे छायाचित्र

सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहे. सोमवारी सकाळी ६ वाजून ४३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच कोयना परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. घाबरलेले नागरिक बराच वेळ रस्त्यावर आणि मैदानावर उभे होते. आतापर्यंत भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही. तसंच, कोयना परिसरासह कोकण किनारपट्टी परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे सांगितले जात आहे. 

आता राहुल आणि प्रियांका गांधींनी लोकांना केलं हे आवाहन

दरम्यान, याआधी २० जून रोजी सातारा भूकंपाच्या धक्क्याने हादरले होते. कोयना आणि आसपासच्या परिसरात ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले होते. तेव्हा देखील घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली होती. साताऱ्याच्या कोयना परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यावेळी देखील कोणतेही नुकसान झाल्याची माहिती नाही. 

नुसत्या आडनावाने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची टीका