पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१९९३ मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी अब्दुल गनीचा मृत्यू

१९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचे संग्रहित छायाचित्र

१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी अब्दुल गनी तुर्कचे गुरुवारी नागपूर येथील जीएमसी रुग्णालयात मृत्यू झाला. नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता. प्रकृती अस्वास्थामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुर्कला टाडा न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. 

टॅक्सी ड्रायव्हर अब्दुल गनी तुर्कला सेंच्युरी बाजारातील मॅनहोलच्या खाली आरडीएक्स लावल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. या मॅनहोलवरुन बस जाताना स्फोट झाला होता. यात ११३ लोक ठार तर २२७ जण जखमी झाले होते. वाहनात स्फोटके लावल्याप्रकरणीही तुर्कला दोषी ठरवण्यात आले होते. स्फोटके लावलेली वाहने मुंबईतील विविध ठिकाणी लावण्यात आली होती. 

दरम्यान, १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरुन गेला होता. या स्फोटात दाऊद इब्राहिम, याकूब मेमन आणि त्याचा भाऊ टायगर मेमन हे मुख्य सूत्रधार होते. मुंबईत विविध ठिकाणी बॉम्ब लावणाऱ्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन अद्याप फरार आहेत.