पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूर हादरले, बलात्कारानंतर आरोपीकडून पीडीतेवर क्रुर कृत्य

नागपूर बलात्कार

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय तरुणीवर ५२ वर्षाच्या व्यक्तीने  बलात्कार केल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या पारडी भागात ही घटना घडली आहे.  आरोपीने तरुणीवर रात्रभर बलात्कार केला त्यानंतर त्याने तरुणीच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसवली. या घटनेमुळे नागपूर हादले असून गृहमंत्र्यांच्या नागपूरामध्ये महिला आणि तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीला गोंदिया येथून अटक केली आहे. 

सत्ता येताच सरकारी जमिनीवरील मशिदी हटवूः भाजप खासदार

ही धक्कादायक घटना २१ जानेवारी रोजी घडली होती. पीडित तरुणीने याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तिची वैद्यकिय तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी ५२ वर्षीय आरोपी योगीलाला विरोधात तक्रार दाखल केली. योगीलालला सोमवारी गोंदिया येथून अटक करण्यात आली. आरोपी सूत गिरणीमध्ये सुपरवाइजरचे काम करत होते. पीडित तरुणी त्याठिकाणी मजूरीचे काम करते.

मुंबईत फटका गँगला रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून नवा उपाय

पीडित तरुणी तिचा भाऊ, आरोपी आणि आणखी एक तरुणी पारडी भागामध्ये भाड्याच्या घरात राहतात. पीडित तरुणीचा भाऊ आणि दुसरी तरुणी २१ जानेवारी रोजी कामानिमित्त बाहेर गेले होते. तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. पीडितेचा भाऊ घरी आल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. 

'केंद्राने लवकर परवानग्या दिल्या तर महाराष्ट्राचा विकास होईल'