पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १,३८० वर, ९७ रुग्णांचा मृत्यू

कोरोना विषाणूबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

राज्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी राज्यात १६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,३८० वर पोहचला आहे. गुरुवारी राज्यात कोरोनाचे २२९ नवे रुग्ण आढळले होते. 

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारत मोठ्या प्रमाणात यशस्वी, तरीही...

आरोग्य विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २२९ रुग्ण आढळले होते. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १,३६४ झाला होता. तर आज सकाळी आणखी १७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या आकड्यामध्ये वाढ होत तो १३८० वर पोहचला आहे. राज्यात आतापर्यंत ९७ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर, १२५ कोरोनाबाधित  रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. 

सांगलीतील २४ रुग्ण कोरोनामुक्त, मंत्र्यांकडून डॉक्टरांचे अभिनंदन

दरम्यान, मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईतल्या दाट लोकवस्ती असलेल्या धारावी आणि वरळीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आज धारावीमध्ये आणखी ५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा २२ वर पोहचला आहेत. तर दादरमध्ये आज तीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन नर्स आणि एका वृध्दाचा समावेश आहे. 

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारत मोठ्या प्रमाणात यशस्वी, तरीही...

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:16 new covid 19 positive cases have been reported in the state positive cases in the state to 1380