पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १०१८ वर, १५० नव्या रुग्णात भर

कोरोना विषाणू (संग्रहित छायाचित्र)

राज्यात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. राज्यात एका दिवसात आणखी १५० नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०१८ वर पोहचली आहे. तर कोरोनाबाधित ७९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ८७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

CM ठाकरेंच्या १६० जणांच्या सुरक्षा ताफ्यावर क्वॉरंटाइनची वेळ!

राज्यात एका दिवसात १२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी ६ मुंबई,  ३ पुणे  तर प्रत्येकी १ मृत्यू नागपूर, सातारा आणि मीरा भाईंदर येथे झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा ६४ वर पोहचला आहे. मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये इतरही आजार आढळले आहेत.  

कोविड-१९: पुण्यातील सील करण्यात आलेल्या परिसरात कर्फ्यू लागू

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० हजार ८७७ नमुन्यांपैकी १९ हजार २९० जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १०१८ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत ७९ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४ हजार ६९५ व्यक्तींना होम क्वारंटाइन केले असून ४००८ लोकांना संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

'कोरोनाचा एक रुग्ण ३० दिवसांत ४०६ जणांना करु शकतो बाधित'

राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण

मुंबई -  ६४२ (मृत्यू ४०)
पुणे -  १३० (मृत्यू ०८)
पुणे (ग्रामीण) -  ०४
पिंपरी चिंचवड मनपा - १७
सांगली - २६    
ठाणे  मनपा - २१  (मृत्यू ०३)
कल्याण डोंबिवली मनपा - २५  (मृत्यू ०१)
नवी मुंबई मनपा - २८ (मृत्यू ०२)
मीरा भाईंदर - ०३ (मृत्यू ०१)
वसई विरार मनपा - १० (मृत्यू ०२)
पनवेल मनपा - ०६
ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण (मृत्यू १),रत्नागिरी, यवतमाळ प्रत्येकी ०३
नागपूर  - १९ (मृत्यू ०१)
अहमदनगर मनपा - १८
अहमदनगर ग्रामीण - ०७
उस्मानाबाद  - ०४
लातूर मनपा -  ०८
औरंगाबाद मनपा  - १२ (मृत्यू ०१)
बुलढाणा - ०७  (मृत्यू ०१)
सातारा  - ०६ (मृत्यू ०१)
कोल्हापूर मनपा -  ०२    
उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशीम, अमरावती - प्रत्येकी १ रुग्ण (मृत्यू २ जळगाव व अमरावती)