पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूरमध्ये सोमनपल्ली नाल्याला पूर; १५ जनावरं गेली वाहून

चंद्रपूर पूर

चंद्रपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पूरामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच नाल्याला आलेल्या पूरामध्ये १५ जनावरं वाहून गेल्याची घटना घडली आहे. गोंडापिपरी तालुक्यात ही घटना घडली आहे. 

चिदंबरम यांना झटका,हायकोर्टच्या आदेशाला स्थगितीस SCचा नकार

गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली नाल्याला पूर आला आहे. या पूरामध्ये १५ जनावरं वाहून गेली. रविवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. सोमनपल्ली-कोंढाणा मार्गात मोठा नाला आहे. या नाल्यावरील पूल दहा वर्षांपूर्वीच क्षतिग्रत झाला होता. सोमनपल्ली येथील शेतक-यांची शेती कोंढाणा परिसरात आहे. त्यामुळे त्यांना या नाल्याच्या पाण्यातूनच मार्ग काढत जावे लागते. 

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'नारळ'

दरम्यान, रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमनपल्ली नाला दूथडी भरुन वाहत होता. दरम्यान शेतातील काम आटपून सर्व शेतकरी घराकडे जात होते. यातच जनावरांचा कळप नाल्यातील पाण्यात उतरला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यात १५ जनावरं वाहून गेली. गेल्या आठवडाभरामध्ये याच नाल्यामध्ये आतापर्यंत ५० पेक्षा अधिक जनावरं वाहून गेली आहेत.

मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले