पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१४ वर्षाच्या मुलाचा ८ वर्षीय मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर नेत्याने बलात्कार केल्याचा आरोप (प्रातिनिधीक छायाचित्र)

दिंडोरी (जि. नाशिक) तालुक्यातील मोहाडी येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने ८ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उ़डाली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आले असून न्यायालयाने त्याची १५ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. दिंडोरी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

... ते काय करतात मला बघायचंय, नव्या व्हिडिओवरून संजय राऊतांचे विधान

अधिक माहिती अशी, मोहाडी येथील गायकवाडनगर येथे आई-वडील घरी नसताना आठ वर्षे मुलगी घरी खेळत होती. त्या घरासमोरच असणारा एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने तिला खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. सायंकाळी आई-वडील घरी आल्यानंतर जेव्हा त्या मुलीला त्रास होत होता. आईने विचारणा केली असता, तिने घडलेला प्रसंग सांगितला.

मोबाइल गेमचे आमिष दाखवत सहा वर्षाच्या मुलीवर तरुणाचा बलात्कार

दिंडोरी पोलिस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी या अल्पवयीन आरोपीला दिंडोरी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने १५ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.