पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परिक्षेसाठी जाणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

विद्यार्थ्याचा मृत्यू

परिक्षेसाठी जाणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याचा अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे ही घटना घडली आहे.  बारावीचे दोन विद्यार्थी परिक्षेसाठी दुचाकीवरुन जात होते. त्याच दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा विद्यार्थी जखमी झाला.

देवेंद्र फडणवीसांना नागपूर कोर्टाकडून जामीन मंजूर

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या विद्यार्थ्याचा आज मराठीचा पेपर होता. मोहोळ येथील सौरभ दशरथ वाघ आणि स्वप्निल चव्हाण हे दोघे परिक्षेसाठी दुचाकीवरुन महाविद्यालयात जात होते. त्याचवेळी महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये सौरभचा जागीच मृत्यू झाला. 

हिंगणघाट प्रकरणातील आरोपीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

दरम्यान, सौरभसोबत दुचाकीवर असलेला स्वप्निल अपघातात जखमी झाला. जखमी अवस्थेत स्वप्निलने पेपर सोडवला. मृत विद्यार्थी सौरभ मोहोळच्या नेताजी विद्यालयाचा विद्यार्थी होता. तर जखमी स्वप्निल मोहोळच्या नागनाथ विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तर, या अपघाताचा अधिक तपास मोहोळ पोलिसांकडून सुरु आहे.

शालेय विद्यार्थ्यांना यापुढे सरकारकडून मोफत चष्मे