पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यात लवकरच बदल

शाळेतील विद्यार्थी (संग्रहित छायाचित्र)

शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणे शक्य आहे का, याची चाचपणी करण्यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० शाळांत प्रायोगिक तत्त्वावर या पद्धतीने उपस्थिती नोंदविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या शाळांमध्येच या पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली जाणार आहे. जर प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यात महाराष्ट्र बोर्डाच्या सर्वच शाळांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदली जाईल.

... आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बासरीवादनाने संसदीय समितीला केले थक्क

सध्या १२० शाळांमध्ये पुढील तीन महिन्यांसाठी या पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली जाईल. यासाठी संबंधित मशिन शाळेत बसविण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. शाळेमध्ये फक्त विजेची उपलब्धता असणे आवश्यक आहे. औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि पालघर या पाच जिल्ह्यांतील १२० शाळांची निवडही त्यासाठी करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तातील विद्यार्थ्यांना आपली उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवावी लागेल.

गूड न्यूज : दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग लवकरच वेटिंग लिस्ट मुक्त

जर हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाला, तर राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र बोर्डाच्या शाळेत या इयत्तांतील विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने आपली उपस्थिती नोंदवावी लागेल. दरम्यान, शाळांनी ही पद्धती अवलंबिण्याला काहीशी नाराजी दर्शविली आहे. ही पद्धत वेळखाऊ असल्याचे शाळांनी म्हटले आहे.