पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ८६८ वर; ७० रुग्णांना डिस्चार्ज

कोरोना विषाणू चाचणी (संग्रहित छायाचित्र)

राज्यात कोरोना विषाणूचे थैमान वाढत चालले आहे. सोमवारी कोरोनाच्या आणखी १२० रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ८६८ वर पोहचला आहे. राज्यात एका दिवसात ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७० कोरोनाबाधितांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या योजनांवर काम करा : नरेंद्र मोदी

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२ हजार ५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३४९८  जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. 

कोविड-१९ : पुण्यातील हा परिसर सील करण्याचे आदेश

आरोग्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर  शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ८ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीममधील आहे. 

'तबलिगी समाजातील २५,५०० लोक विलगीकरण कक्षात'

दरम्यान, सोमवारी राज्यात ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा ४५ वर पोहचला आहे. सोमवारी मृत्यू झालेल्यांपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत. सोमवारपर्यंत मृत्यू झालेल्या एकूण ४५ रुग्णांपैकी साधारणपणे ७८ टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजारही होते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

२४ तासांत कोरोनामुळे देशात २८ जणांचा मृत्यू, ७०४ नवे रुग्ण