पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील १२ जणांना विषबाधा

अहमदनगर विषबाधा

अहमदनगरमध्ये अन्नातून एकाच कुटुंबातील १२ जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील देहेरे गावात ही घटना घडली आहे. बाजरीच्या भाकरीतून विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या सर्वांवर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. 

राहुल गांधींनी माफी मागावी; राफेलवरून भाजप आक्रमक

देहेरे गावातील माळी कुटुंबातील १२ जणांना विषबाधा झाली आहे. माळी कुटुंबात गुरुवारी लग्नसोहळा होता. त्यासाठी पाहुणे आले होते. शुक्रवारी दुपारच्या जेवणामध्ये बाजरीच्या भाकऱ्या बनवण्यात आल्या होत्या. जेवण झाल्यानंतर सर्वांना अस्वस्त वाटू लागले. अनेकांना उलट्या आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यांना ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

काळवीट, हरिणाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडले

ग्रामीण रुग्णालयात सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्यांना जास्त त्रास होत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अवकाळी पावसामध्ये भिजलेली बाजरी आणि जुनी बाजरी एकत्रित करुन त्याच्या भाकरी बनवण्यात आल्या होत्या. त्यामधून माळी कुटुंबियांना विषबाधा झाली. विषबाधा झाली तेव्हा नवरा-नवरी देवदर्शनासाठी गेले होते. त्यामुळे ते बचावले. 

आता सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच देहरे गावामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने धाव घेतली. त्यांनी बाजरीच्या पीठाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी हे नमुने प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. माळी कुटुंबातील विषबाधा झालेल्या सर्वांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

राहुल गांधींनी माफी मागावी; राफेलवरून भाजप आक्रमक