पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या २३वर, एकाच दिवसात १२ जण पॉझिटिव्ह

कोरोना विषाणू

सांगलीतील इस्लामपूरमध्ये शुक्रवारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजच्या एकाच दिवशी तब्बल १२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. या नवीन रुग्णांमुळे सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या २३ वर गेली आहे. विशेष म्हणजे यातील २० जण हे एकाच कुटुंबातील असून उर्वरित रुग्ण हे त्यांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या १४७ पर्यंत गेली आहे. 

कोरोनाविरोधातील लढाईसाठी साई संस्थानकडून ५१ कोटींची मदत

इस्लामपूरमधील एक कुटुंब काही दिवसांपूर्वी विदेशातून आले होते. हे कुटुंब मोठे असल्यामुळे त्यांच्यातील अनेकांना याची लागण झाली होती. त्याचबरोबर काही जण या कुटुंबीयांच्या संपर्कात आले होते. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विभागाने राज्याचा आकडा १४७ गेल्याचे जाहीर केले आहे. 

...म्हणून चंद्रकांत पाटील यांनी सुरक्षा केली परत

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत १९ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोना बरा होतोय ही आशादायक बाब असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:12 more people test positive for Coronavirus in Sangli Till now there are 147 positive cases in Maharashtra