पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २८०१ वर, ११७ रुग्णांमध्ये भर

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा विळखा आणखी वाढत चालला आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचे आणखी ११७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २८०१ वर पोहचला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे. आज आढळलेल्या ११७ कोरोनाबाधितांपैकी ६६ रुग्ण मुंबईचे आहेत तर ४४ रुग्ण हे पुण्याचे आहेत. 

... या कामांना लॉकडाऊनमधून वगळले, सरकारच्या सूचना जारी

मुंबईमध्ये दाट लोकवस्ती असलेल्या वरळी आणि धारावीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी दिवसभरात मुंबईत कोरोनाचे २०४ नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १७५३ वर पोहचला होता. तर बुधवारी दुपारी आलेल्या आकडेवारीनुसार आणखी ६६ नवे रुग्ण आढळले आहेत. मंगळवारपर्यंत मुंबईमध्ये १११ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २८०१ वर, ११७ रुग्णांमध्ये भर

दरम्यान, राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये ३० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. या काळामध्ये सर्वांनी लॉकडाऊनचे पालन करावे, घराबाहेर पडू नये असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तसंच ज्या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत त्याठिकाणी पालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 

 अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ लाखांच्या वर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:117 new cases recorded today in the state the total number of positive cases in the state stands at 2801 now