पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शस्त्रक्रियेला घाबरून ११ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

जिभेखाली आलेली गाठ शस्त्रक्रिया करून काढावी लागणार असल्याने डॉक्टर आणि वडिलांमधील संवाद ऐकून घाबरलेल्या ११ वर्षांच्या बालिकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई शहरात घडली. प्रियांका सुभाष लोंढे (रा. परळी वेस, अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. 

मुलाला गळफास लावण्यास मदत केल्यावरून बंगळुरूमध्ये वडिलांना अटक

प्रियांकाच्या जिभेखाली गाठ आल्याने तिचे वडील सुभाष यांनी तिला  रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर जिभेखालील गाठ शस्त्रक्रिया करून काढावी लागेल, असा सल्ला वडिलांना दिला. दवाखान्यात डॉक्टर व वडिलांमधील संभाषण तिने ऐकले होते. आता आपल्यावर शस्त्रक्रिया होणार या कल्पनेने ती घाबरली. या भीतीपोटी तिने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पुण्यात राष्ट्रीय जलतरणपटूची आत्महत्या