पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीतील ब्रम्हनाळ येथे बोट उलटली; 9 जणांचा मृत्यू

सांगली महापूर

सांगली जिल्ह्यामध्ये मोदी दुर्घटना घडली आहे. पूरामध्ये अडकलेल्यांना घेऊन जाणारी बोट उलटली. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बोटीमधून 25 ते 30 पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होते.

सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातल्या ब्रम्हनाळ गावाजवळ ही घटना घडली आहे. ब्रम्हनाळ गावाला पूराचा फटका बसला आहे. पूरामध्ये अडकलेल्या या गावातील लोकांच्या बचावासाठी एक खासगी बोट गेली होती. या बोटीमधून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असताना कृष्णा नदीच्या पूरामध्ये बोट उलटली. या बोटीमध्ये 25 ते 30 जण होते. त्यामधील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, घटनास्थळावर एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. बचावकार्याला सुरुवात झाली आहे.