पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशिकः पाण्याच्या बादलीत पडून ११ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून ११ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नाशिकमधील मोरे मळा येथे घडली. तन्मय दीपक भोये असे मृत बालकाचे नाव आहे. 

मुलुंडमध्ये रिक्षावर झाड कोसळून एकाचा मृत्यू

मोरे मळा येथे दीपक भोये कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांच्या घरात पाण्याची बादली भरून ठेवली होती. घरातील सर्वजण आपापल्या कामात व्यग्र होते. त्याचवेळी चिमुकला तन्मय रांगत पाण्याने भरलेल्या बादलीजवळ गेला. बादलीत तोंड बुडवण्याचा प्रयत्न करत असताना तो पाण्यात पडला. 

नाकातोंडात पाणी गेल्याने तो अत्यवस्थ झाला. दरम्यान, दीपक भोयेंनी त्याला तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करत आहेत.

शेततळ्यात बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू