पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात पुण्यात ८ तर मुंबईत २ कोरोनाग्रस्त रुग्ण : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात आतापर्यंत एकुण १० रुणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात ८ रुग्णांवर तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात २ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सर्व रुग्णांची  प्रकृती स्थिर असल्याचे ते म्हणाले. दुबईहून परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यासोबतच्या सर्व सह प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. आतापर्यंत जे कोरोना ग्रस्त रुग्ण आढळले आहेत ते सर्व एकमेकांच्या संपर्कातील आहेत. रुग्णांची लक्षणेही सौम्य असल्यामुळे नागरिकांनी या आकड्यामुळे घाबरु नये, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले केले.  

पुण्यानंतर मुंबईत आढळले कोरोनाचे दोन रुग्ण, राज्यातील आकडा

पुण्यातील शाळांना सुट्टी देण्याचा कोणताही निर्णय नाही

पुण्यातील ज्या परिसरातील लोकांना कोरोनाची लागण झाली आहे त्या परिसरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र सध्याच्या घडीला घाबरुन जाऊन असा कोणताही निर्णय घेण्याची गरज नाही. सरकारकडून दर दोन तासांनी यासंबधीचा आढावा घेण्यात येत आहे. पुढील दोन दिवसातील परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

कोरोनामुळे पुण्यातील काही शाळा रविवारपर्यंत बंद

अधिवेशन लवकरात लवकर आटोपणार!

सध्याच्या परिस्थितीत लोकप्रतिनिधींना आपापल्या वार्डात जाण्याची गरज आहे. अधिवेशनामुळे प्रशासनाची लोकही इथं अडकून आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवार ते रविवारपर्यंत सर्व कामकाज आटोपून अधिवशेन संपवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात विरोधी पक्षासोबतही चर्चा केल्याचे ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:10 positive cases of coronavirus found in Maharashtra including 8 positive cases in Pune and 2 Mumbai says CM Uddhav Thackeray