पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघरमध्ये एसटी-ट्रकची समोरासमोर धडक; १० प्रवासी जखमी

पालघर अपघात

पालघरमध्ये बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. मोखाडा तालुक्यातील देवगाव फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १० प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील ५ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

'पंकजा मुंडे पक्ष बदलण्याबाबतच्या चर्चेत तथ्य नाही'

पालघरवरुन नंदुरबारच्या दिशेने जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला धडक दिली. या अपघातामध्ये एसटीच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

मंत्र्यांना बंगल्याचे वाटप जाहीर; या ठिकाणी राहणार हे मंत्री