पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लॉकडाऊनमुळे राज्यात १० हजार टन ताजी मासळी समुद्रात फेकली'

संग्रहित छायाचित्र

 लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात जवळपास १० हजार टन ताजी मासळी समुद्रात फेकून द्यावी लागली आहे.  पकडलेल्या ताज्या मासळीची साठवणूक करण्यासाठी शीतगृहांची असलेली कमतरता, लॉकडाऊनमुळे  वाहतूक आणि पॅकेजिंगमध्ये आलेले अडथळे, तसेच साठवणुकीसाठी बर्फच उपलब्ध नसल्यानं मासेमारांना हे पाऊल उचलावं लागलं आहे. 

 राज्याच्या प्रत्येक किनारी भागातील मासेमारांकडून माहिती गोळा करून  नॅशनल फिशरमॅन फोरम आणि नॅशनल पर्सेसिन  फिशरमन वेल्फेअर असोशिएशननं ही माहिती दिली आहे. २२ मार्चनंतर दरदिवशी ही माहिती मासेमारी करणाऱ्या बांधवांकडून गोळा केली जात आहे. याची दखल मत्सविभागानं घेतली आहे.

टोकियो ऑलिम्पिकचे नवे वेळापत्रक जाहीर

कोणत्याही जिल्ह्यात पकडलेले ताजे मासे वाया जाऊ नये याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आज देण्यात येतील असं मत्स विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 
लॉकडाऊन असले तरी मत्सविक्रीला बंदी नाही. मात्र ही विक्री सुरक्षित अंतर राखून आणि कोरोनाविषयी आरोग्य विभागानं दिलेल्या सर्व सूचना पाळून  करण्यात करण्यात यावी असं मत्सविक्रेत्यांना सांगण्यात आले आहे.  

'लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे, मात्र आता मत्सव्यवसायाचा कणा मोडून पडण्याची वेळ आली आहे. आम्हाला १ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे, कारण दोन महिन्यांनंतर पावसाळ्यास सुरुवात होणार आहे  त्यामुळे मासेमारीवरदेखील बंदी येईल, अशी माहिती नॅशनल पर्सेसिन  फिशरमन वेल्फेअर असोशिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दिली. 

कोरोना : मृतदेह फक्त दहन करण्याचा आदेश मागे, नवाब मलिकांनी दिली माहिती