मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी दगडफेक; दोन प्रवासी जखमी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी दगडफेक; दोन प्रवासी जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 28, 2023 02:15 PM IST

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर रात्रीच्या वेळी दगड फेकीच्या घटना वाढल्या आहे. नुकतीच अशीच एक घटना उघडकीस आली असून या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

samruddhi mahamarg inauguration
samruddhi mahamarg inauguration (HT)

नागपूर : समृद्धी महामार्गावरील अपघातसत्र चिंतेची बाब असताना आता नवीन दगडफेक आणि लुटमारीच्या वाढत्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर वैजापूरच्या सुराळा शिवारात रात्रीच्या वेळी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोघे जखमी झाले असून यातील जखमी मुलाची परिस्थिती गंभीर आहे. या पूर्वीही वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळ येथून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती.

उद्घाटन झाल्यापासून समृद्धी महामार्ग विविधी कारणामुळे चर्चेत आहे. सुरवातीला या मार्गावरील अपघात चिंतेची बाब बनली होती. तसेच महामार्गावर वणीपराण्यांचा मुक्त वावर ही चिंतेची बाब बनली होती. मात्र, आता लुटमारीच्या आणि दगडफेकीच्या घटनांमुळे या मार्गाने प्रवास करावा की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सोमवारी राती या मार्गावर आज्ञातांनी दगड फेक केली. राजस्थान येथील भाविक हे शिर्डी येथून दर्शन घेऊन समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना, वैजापूरच्या सुराळा शिवारात त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. रविवारी रात्री १०च्या सुमारास ही घटना घडली.

यात दोघे जखमी झाले असून दुसऱ्या एक जखमी मुलाची प्रकृती ही चिंताजनक आहे. अशीच एक घटना १३ मार्च रोजी देखील घडली होती. काही प्रवासी हे शिर्डीहून नागपूरकडे प्रवास करत करत असतांना त्यांची गाडी ही छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारातील समृद्धी महामार्गावर येताच काहीनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या बाबत माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, आरोपी हे फरार झाले होते.

WhatsApp channel

विभाग