Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातेरी गावात तूफान दगडफेक, तणावाचे वातावरण, गावात चोख बंदोबस्त
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातेरी गावात तूफान दगडफेक, तणावाचे वातावरण, गावात चोख बंदोबस्त

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातेरी गावात तूफान दगडफेक, तणावाचे वातावरण, गावात चोख बंदोबस्त

Jun 28, 2024 09:04 AM IST

stone pelting in manoj jarange matori village Materi : राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सुरू असतांना मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातेरी गावात दोन गटात मोठी दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी गावात तूफान दगडफेक, तणावाचे वातावरण, गावात चोख बंदोबस्त
मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी गावात तूफान दगडफेक, तणावाचे वातावरण, गावात चोख बंदोबस्त

stone pelting in manoj jarange matori village Materi : राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सुरू असतांना मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातेरी गावात गुरुवारी रात्री दोन गटात मोठी दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. डिजेवरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती असून येथील बसस्टॉप येथे दोन्ही गटाने दगडफेक केल्याने अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत काही जण जखमी देखील झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा ही गुरुवारी बीडमध्ये पोहोचली. यावेळी त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान, यानंतर त्यांचा दौरा हा भगवानगड जाणार होता. भगवान बाबाचे दर्शनाचा नियोजित कार्यक्रम त्यांचा होता. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. लक्ष्मण हाके यांनी त्यांची अभिवादन यात्रा स्थगित केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या बीड येथील शिरूर कासार तालुक्यातील मातेरी गावात काल बसस्टॉप परिसरात डिजे सुरू होता. यावेळी अचानक दोन गट आमने सामने आले. यावेळी दोन्ही गटाने एकमेकांवर तूफान दगड फेक केली. या दगड फेकीत काही नागरिक जखमी झाले तर काही दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले. ही घटना कळल्यावर पोलिस व शीघ्र कृती दलाचे पथक गावात दाखल झाले. पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. रात्री मातेरी गावात व बीड आणि नगरच्या बाजूने नागरिकांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले होते.

मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन सुरू केले आहे. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे नाही स्वतंत्र आरक्षण द्यावे या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांचा पाठिंबा आहे. या मुळे दोन्ही समाजात संघर्ष सुरू झाला आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. दरम्यान, दगडफेकीच्या घटनेनंतर दोन्ही नेते काय भूमिका घेणार याकडे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर