Titwala Murder Case : ठाण्यातील टिटवाळा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मुलाने त्याच्या सावत्र बापाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. सावत्र बापाची बहिणीवर वाइट नजर असल्याच्या संशयातून त्याने बापाची हत्या केली आहे. कल्याण पोलिसांनी १२ तासांत आरोपीचा चंद लावत त्याला अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री कल्याणजवळील टिटवाळा परिसरातील बालायणी येथे घडली.
कबीर सिद्दिकी आणि त्याचा मित्र अलताफ शेख अशी आरोपींची नावे आहेत. तर, कदीर सिद्दीकी असे खून करण्यात आलेल्या सावत्र बापाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कादिर सिद्दिकीची निर्घृण हत्या करण्यात आली. काही वर्षांपूर्वी कादीरने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेसोबत लग्न केलं होतं. या महिलेला पहिल्या पतीपासून दोन मुलं होती. कादीरचा सावत्र मुलगा कबीर याला संशय आला की कादीरची त्याच्या बहिणीवर वाईट नजर आहे. त्यामुळे तो कादिरवर संतपला होता. या प्रकरणामुळे कबीरने त्याच्या सावत्र बापाची हत्या करायचे ठरवलं होतं. त्यानुसार चुलत भावाच्या मदतीने त्याने सावत्र बापाची हत्या केली.
कादीर सिद्दीकी याचा सावत्र मुलगा कबीर यानेच खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कबीरचा चुलत भाऊ अल्ताफ शेख याचाही या हत्येत सहभाग होता. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी तपास सुरू केला. टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला शोधून काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, कादिरने काही वर्षांपूर्वी त्याच्या पेक्षा जास्त वय असलेल्या एका महिलेशी लग्न केले होते. महिलेचा हा दुसरा विवाह होता. महिलेला तिच्या पहिल्या पतीपासून दोन मुले, एक मुलगी आणि एक मुलगा, दोघेही आई आणि कादिर यांच्यासोबत राहत होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होते. पण काही दिवसांपासून कादिरचा सावत्र मुलगा कबीर याला संशय येऊ लागला की कदीर आपल्या बहिणीकडे वाईट नजरेने पाहत आहे. या संशयातून त्याने खुनाचा कट रचला.
आरोपीने रविवारी रात्री कदीरवर धारदार शस्त्राने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. पोलिसांना सुरुवातीपासूनच कबीरवर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच त्याने गुन्हा कबूल केला आहे. चुलत भाऊ अलताफ शेख याच्या मदतीने त्याने सावत्र बापाची हत्या केली अशी कबुली त्याने दिली आहे.
संबंधित बातम्या