मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यातील ऑनलाईन सर्वेक्षणाची मुदत वाढवली; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय

राज्यातील ऑनलाईन सर्वेक्षणाची मुदत वाढवली; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 30, 2024 11:28 PM IST

Maratha Survey : राज्यात राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण करण्याची मुदत ३१ जानेवारी होती, पण आता यासाठी आणखी दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे.

Maratha Survey
Maratha Survey

Maratha Reservation- २३ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान केल्या जात असलेल्या मराठा व ओपन वर्गाच्या सर्वेक्षणाची मुदत वाढवण्यात आली आहे. राज्य मागास आयोगाने सर्वेक्षणाची मुदत दोन दिवसांनी वाढवली आहे.  राज्यात राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण करण्याची मुदत ३१ जानेवारी होती, पण आता यासाठी आणखी दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. 

राज्यातील मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने काही निकष निश्चित केले आहेत.  त्यानुसार सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पण या सॉफ्टवेअरमध्ये अनेक ठिकाणी अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. 

यावर चर्चा करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून आज ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सध्या सुरु असलेल्या सर्वेक्षणाबाबत चर्चा झाली. २३ जानेवारीपासून हे सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिट्युटकडून सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. सर्वेक्षण करताना अनेक अडचणी येत असल्याची काही अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल लवकरात लवकर कसा करता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली. 

WhatsApp channel