stampede at Bandra railway station : वांद्रे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर रविवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती ही गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. जास्त गर्दीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेत चढण्यासाठी झालेल्या हाणामारीदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. वांद्रे टर्मिनलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे ५ वाजून ५६ मिनिटांनी ही घटना घडली.
२२९२१ वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस मध्ये चढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी हाणामारी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की या घटनेतील जखमींची ओळख पटली आहे. शब्बीर अब्दुल रेहमान (वय ४०), परमेश्वर सुखदार गुप्ता (वय २८), रवींद्र हरिहर चुमा (वय ३०), रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती (वय २९), संजय तिलकराम कांगे (वय २७), दिव्यांशू योगेंद्र यादव (वय १८), मोहम्मद शरीफ शेख (वय २५), इंद्रजित सहानी (वय १९) आणि नूर मोहम्मद शेख (वय १८) अशी त्यांची नावे आहेत.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लांब पल्ल्याच्या ट्रेन सुटणाऱ्या वांद्रे टर्मिनस येथून सुटणारी वांद्रे-गोरखपूर ट्रेन पकडण्यासाठी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली. त्यातही प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मोठ्या संख्येनं एकाच वेळेस प्रवासी आल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये किमान नऊ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून सर्वांवर भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दिवाळीनिमित्त वांद्रे स्थानकातून विशेष ट्रेन सोडल्या जात आहेत.
चेंगराचेंगरीत नऊ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून जखमी झालेल्या प्रवाशांची स्थिती गंभीर आहे. एका प्रवाशाची मांडी फाटली तर एका प्रवाशाचा हात तुटला. तर अनेक प्रवाशांचे प्रवाशांचे कपडे फाटले. एका प्रावाशाच्या कंबरेला गंभीर मार लागला आहे. काही प्रवाशांचे रक्त प्लॅटफॉर्मवर सांडलेले होते
दिवाळी निमित्त घरी जाणाऱ्यांची मोठी संख्या आहेत. विशेषत: उत्तर भारतातून आलेले नागरिक त्यांच्या गावी जण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. वांद्रे येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येत आहेत. या गाड्या प्रवाशांनी तुडुंब भरल्या आहेत. नागरिकांनी घरी जाण्यासाठी गर्दी केल्याने रेल्वे स्थानकावर पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. त्यात गाडीत चढण्यासाठी वाद झाल्याने ही घटना घडली.
संबंधित बातम्या